औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मागणीसाठी जळगावमध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे आंदोलन
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
जळगाव: संपूर्ण भारतभर विविध ठिकाणी आंदोलन करत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज, १७ मार्च रोजी ठिय्या आंदोलन केले. यामध्ये क्रूर मुघल बादशाह औरंगजेबाची कबर हटवावी अशी जोरदार मागणी करण्यात आली.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आणि भारत हा सनातन संस्कृतीचा देश आहे. त्यामुळे औरंगजेबासारख्या अत्याचारी मुघल बादशाहाची कबर या भूमीत असणे देशासाठी अशोभनीय आहे, असा सूर आंदोलकांनी लावला.
अशा प्रकारची मागणी निवेदनाद्वारे व आंदोलनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्य यांच्याकडे करण्यात आलेली आहे.
आंदोलनामध्ये व निवेदन सादर करताना योगेश्वरी गर्गे प्रांतमंत्री ,शांताराम शिंदे विभाग मंत्री, देवेंद्रभावसार विभाग सहमंत्री, खंडुपवार जिल्हा उपाध्यक्ष,राकेश लोहार विभाग संयोजक, राजेंद्र गांगुर्डे जिल्हा सह मंत्री,संतोष पाटील शिवसेना शिंदे गट ,जितेंद्र मराठे भाजपा, पियुष कोल्हे , निलेश तायडे, मनोज बाविस्कर, सतीश गायकवाड व सर्व विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.