back to top
शुक्रवार, सप्टेंबर 26, 2025

गावाच्या विकासासाठी कटिबद्ध – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गावाच्या विकासासाठी कटिबद्ध – पालकमंत्री गुलाबराव पाटील

- Advertisement -

शिरसोलीत भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न

जळगाव: प्रतिनिधि “गद्दार-खोके हा डाग जनतेने पुसला असून विरोधकांची बोलती बंद केली आहे,” अशा शब्दांत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जनतेच्या भावना व्यक्त केल्या. शिरसोली येथे त्यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. “सत्ता टिकवण्यासाठी नाही, तर समाजाच्या सेवेसाठी आहे. मला गरीब जनतेच्या सेवेमुळे उर्जा मिळते, त्यामुळे मी दिवस-रात्र जनतेसाठी झटतो,” असे भावनिक वक्तव्य त्यांनी केले.

- Advertisement -

शिरसोलीत बारी पंच मंडळ आणि ग्रामस्थांच्या वतीने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. विठ्ठल-रखुमाई मातेची मूर्ती, नागवेल पानाचा कंडा, शाल-श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. शिवसेना-भाजपा महायुतीचे पदाधिकारी, महिला व युवक संघटनांच्या कार्यकर्त्यांनीही मोठ्या उत्साहात त्यांना सन्मानित केले.

मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांसाठी डिजिटल अभ्यासिकासह बारी समाज मंगल कार्यालय लवकरच उभारणार असून DPDCतून ५ कोटींच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूमिपूजन १५ दिवसांत करणार आहे. ३३ KVA वीज उपकेंद्र मंजूर केले असून बारी समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी ‘संत श्री रुपलाल महाराज आर्थिक महामंडळ’ स्थापन केल्याने समाजाला मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागवेलची पाने, बारी समाजाची शान, शिरसोलीच्या विकासासाठी मी आहे ठाम! असल्याचे सांगताच एकाच जल्लोष ग्रामस्थांनी केलां. यावेळी हायस्कूलचे चेअरमन विलास बारी यांनी गावात विद्यार्थ्यांसाठी डिजिटल अभ्यासिका, बारी समाज मंगल कार्यालय आणि महिला बचत गटांसाठी उमेद भवन उभारण्याची मागणी केली. मंत्री गुलाबराव पाटील यांनी तत्काळ या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत मंजुरीचे संकेत दिले.
युवासेना तालुका प्रमुख रामकृष्ण काटोले
यांनी विधानसभा निवडणुकीत युवासेनेने ही ठोक कामगिरी बजावली ,विजय हा सह जा सहजी मिळालेला नाही भाऊनी मतदार संघात केलेला विकास ,शिंदे साहेबांनी योजनांचा केलेला पाऊस यामुळे विजय शक्य असल्याचे सांगितले

शिरसोली हे हिंदुत्ववादी विचारांनी भारलेले गाव आहे. त्यामुळे इथला विकास आणि संस्कृती जोपासण्याचे काम अखंड सुरू राहील! असे शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी सांगितले. यावेळी ज्ञानेश्वर महाजन, हर्षल चौधरी यांनीही मनोगत व्यक्त केली.

यांचीउपस्थिती
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक माजी जि.प. सदस्य सुरेश अस्वार यांनी केले, तर आभार गिरीश वराडे यांनी मानले.
व्यासपीठावरशिवसेनेचे जिल्हा प्रमुख व माजी महापौर विष्णू भंगाळे, राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर महाजन, माजी सभापती नंदलाल पाटील , माजी जि.प. सदस्य पप्पू सोनवणे, धनुबाई आंबटकर, भाजपचे तालुका अध्यक्ष हर्शल चौधरी, मनोहर पाटील, सरपंच हिलाल भिल , सोसायटी चेअरमन बाला पाटील, सूर्यवंशी बारी पंच मंडळाचे अध्यक्ष भीमा अस्वार, उप अर्जुन काटोले, रामकृष्ण कटोले,रवींद्र बारी, देवराम नागपुरे, शरद चव्हाण, राजेंद्र आंबटकर, गिरीश वराडे, रामदास ताडे, गोकुळ ताडे, लक्ष्मण नाईक, रघुनाथ फुसे, मोहन बुंधे, मुकेश अस्वार, नंदलाल सुने, शिवदास बारी, विलास बारी, उमाजी पानगळे, प्रणय सोनवणे, मुदस्सर पिंजारी ग्रा सदस्य, विनोद अस्वार, भगवान बोबडे, अर्जुन पाटील, जितु पाटील, श्याम कोगटा, युवा सेनेचे रामकृष्ण काटोले, रमेशआप्पा पाटील, संदीप सुरळकर, महानगरप्रमुख व नगरसेवक गणेश सोनवणे, कुंदन काळे, मनोज चौधरी, अकील मण्यार, विजय पाटील सर, बबन धनगर, राजू पाटील, पोलीस पाटील, बापू मराठे, नारायण सोनवणे यांच्यासह महिला व महायुतीचे पदाधिकारी, गावातील सर्व समाज बांधव, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Pandit Deendayal Upadhyay | पंडीत दीनदयाल उपाध्याय जयंती निमित्त...

Pandit Deendayal Upadhyay | साक्षीदार न्यूज | भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत महत्त्वाचा वाटा असणारे, एकात्मवाद व अंत्योदय विचारांचे प्रणेते "स्व.पंडित दीनदयाल उपाध्याय" यांच्या जयंती निमित्त...

Agriculture Officer | “शेतकऱ्यांचे संसार पाण्यात, मात्र कृषी अधिकारी...

Agriculture Officer | सुनिल भोळे | जळगाव जिल्ह्यात अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतीतील उभी पिके पाण्याखाली गेली, अनेकांच्या घरांचे नुकसान...

ACB Pollution Control Board | प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्याचा...

ACB Pollution Control Board | साक्षीदार न्यूज | जळगावमध्ये मोठी कारवाई करत लाच घेताना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या क्षेत्र अधिकाऱ्याला एसीबीने अटक केली आहे. प्रमाणपत्रासाठी...

RECENT NEWS