जिल्हा दूध संघात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार – उन्मेष पाटील

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव ;- जिल्ह्यातील शेतकरी, दूध उत्पादक विविध समस्यांनी भरडला जात असतांनाही त्यावर मंत्री गिरीश महाजन शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यात कमी पडले असून ते झोपा काढतात का? असा सवाल करुन खासदार उन्मेष पाटील यांनी पुन्हा गिरीश महाजन यांच्यावर हल्लाबोल केला आहे. जिल्हा दूध संघात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार वाढत असून दूधगंगा ऐवजी दूध संघ भ्रष्टाचाराची गंगा झाल्याचा आरोपही त्यांनी केला. खा. पाटील पत्रपरिषदेत बोलत होते. यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत, महानगर प्रमुख शरद तायडे, गजानन मालपूरे, दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील उपस्थित होते.

- Advertisement -

खासदार उन्मेष पाटील म्हणाले की, दूध संघाचे चेअरमन स्वत:ला मिरवण्यात मग्न झालेले आहे. दूध संघ ही त्यांची खाजगी प्रॉपर्टी नसून शेतकऱ्यांची संस्था आहे. दूध दरवाढ अनुदान उत्पादकांना मिळाले नाही. सरकार दरबारी अनुदानासंदर्भातील प्रस्ताव पाठविला गेला नसल्याने शेतकऱ्यांना हे अनुदान मिळाले नाही. दूधावर प्रक्रिया करणारे प्रकल्प बंद करण्यात आले असून हे चहा पावडत तयार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. दूध उत्पादकांना पूर्वी कार्यशाळेच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जात होते. हे प्रशिक्षण केंद्र धुळखात पडले असून चेअरमन मंगेश चव्हाण हे तेथील रेस्ट हाऊस तयार करण्यात मग्न आहे. दूध उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघात गेले असून तेथे झोपा काढण्यासाठी नाही असा हल्लाही त्यांनी चव्हाण यांच्यावर केला. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी असून त्या सोडविणे गरजेचे झाले असतांनाही चेअरमन त्याकडे लक्ष देत नाहीत. जिल्हा दूध संघ ‘अ’ वर्गात होता तो यांच्या काळात ‘ब’ वर्गात आला असून हेच त्यांचे कार्य असल्याचा टोला हाणला.

दूध संघाचे चेअरमन तथा आमदार मंगेश चव्हाण हे चमकोगिरी करण्यात पुढे असतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागेपुढे करण्यात चे मग्न असून समस्या सोडविण्याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. दूध उत्पादकांच्या समस्या त्वरीत सोडविल्या नाही तर आगामी काळात आंदोलन उभारले जार्इल असा इशाराही खा. पाटील यांनी दिला.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS