साक्षीदार न्युज ; – दि.22 जून रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांबरुड येथील विद्यार्थ्यानी दैदिप्यमान यश मिळवल्यामुळे मंथन परीक्षेचे प्रमुख संदीप पाटील सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
परीक्षेस एकूण 63 विद्यार्थी सहभागी झाले होते.सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. इयत्ता दुसरी मधुन काव्या दुर्वास कोळी व उन्नती ज्ञानेश्वर दारकोंडे या दोघींनी 104/150 (प्रथम) इयत्ता तिसरी मधून दिशा समाधान गरुड 240/300(प्रथम) मानव विकास गवळी 202/300(द्वितीय) इयत्ता चौथी मधून गुणवंत लक्ष्मण महाले (प्रथम)180/300 जान्हवी किशोर पाटील (द्वितीय)178/300 यांनी विशेष यश संपादन केले. मुख्याध्यापक श्री.भाऊसाहेब पवार यांच्यामार्गदर्शना खाली श्री.सुभाष जगताप,श्री. प्रशांत गवळी, श्री.सचीन सोनवणे, श्री. किशोर महाजन,श्री. भटूकांत चौधरी,श्री. ज्ञानेश्वर मनोरे,श्री अनिल बेलदार, श्री.राकेश धायबर श्रीमती.गायत्री जैन श्रीमती रूपाली चौधरी मॅडम श्री.प्रविण सोनकुळ श्री महेश गवादे यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ शिक्षक श्री.सुभाष जगताप तर प्रमुख पाहुणे संदिप पाटील होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सचिन सोनवणे यांनी तर आभार श्री. प्रशांत गवळी सरांनी मानले.
