जळगाव ;– राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने थेट भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल हरीभाऊ जावळे यांच्याशी संपर्क साधत तिकिटाची ऑफर केल्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. रावेर लोकसभेमध्ये जावळे विरुध्द रक्षा खडसे असे चित्रदिसण्याची जोरदार चरचा रंगली असता अमोल जावळे
यांनी आपण इच्छुक नसल्याचे सांगत या गोष्टींना पूर्ण विराम दिला आहे.
रावेर लोकसभा ही भाजपाच्या दृष्टीने बालेकिल्ला आहे. हरिभाऊ जावळे यांचे तिकीट कापून रक्षा खडसे यांना टिकीट दिले होते. त्या दोन वेळा या मतदारसंघातून खासदार झालेले आहे मात्र तिसऱ्या वेळेस त्यांना तिकीट मिळवून देणारे त्यांचे सासरे यांनी भाजपाला रामराम करून राष्ट्रवादीत गेल्यामुळे त्यांना तिकीट मिळणार नाही अशी चिन्हे दिसत होती .तरी सुद्धा रक्षा खडसे यांचे नाव पुन्हा तिसऱ्या टर्म साठी जाहीर असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत . तर
जेव्हा की रावेर लोकसभेमध्ये हरिभाऊ जावळे याचे सुपुत्र व रावेर लोकसभेचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्या नावाची चर्चा व यांनाच तिकीट मिळणार अशी नागरिकांची खात्री होती. त्यांचे नाव न आल्यामुळे अनेकांनी राजीनामे दिले होते.
आता निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले असतांना ते भाजपला जय श्रीराम करत शरद पवार गटाच्या वतीने रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.? की ते अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहणार व त्याला महाविकास आघाडी समर्थन देणार असल्याची चर्चा असतांना अमोल हरीभाऊ जावळे यांच्या समोर सद्यस्थितीत हे दोन पर्याय ठेवण्यात आले आहेत. यात पहिल्या पर्यायात त्यांनी थेट शरद पवार गटाच्या वतीने तुतारी चिन्हावर निवडणूक लढवावी अन्यथा अपक्ष म्हणून त्यांनी मैदानात उतरावे असा दुसरा पर्याय देण्यात आलेला आहे.
दरम्यान अमोल जावळे यांची भूमिका येत्या काही दिवसांत कळणार असून ते महाविकास आघाडीला मदत करतात कि भाजपमध्येच राहून रक्षा खडसे यांचा प्रचारात सहभाग घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. याकडे रावेर मतदार साच्याच्या नागरिकांचे लक्ष लागले आहे.