मन्यारखेडा शिवारातील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव ;- साईनगरात विवाहितेने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील मन्यारखेडा शिवारातील गुरूवारी २४ एप्रिल रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास उघडकी आहे . याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात शुक्रवारी २६ एप्रिल रोजी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, ही आत्महत्या नसून तिच्या पतीने मारहाण करून तिला गळफास दिल्याचा आरोप विवाहितेच्या माहेरच्यांनी केला आहे.

- Advertisement -

ममता रतिलाल राठोड (वय ३०, रा. साईनगर, मन्यारखेडा शिवार, ता. जळगाव) असे मयत विवाहितेचे नाव आहे. तालुक्यातील मन्यारखेडा शिवारातील साईनगर येथे ममता राठोड पती रतीलाल भोजू राठोड आणि एक मुलगा आणि मुलगी यांच्यासोबत वास्तव्याला होत्या. मोलमजूरी करून त्या उदरनिर्वाह करत होत्या. दरम्यान, गुरूवारी २४ एप्रिल रोजी रात्री १० वाजता राहत्या घरात ममता यांनी साडीने गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांनी धाव घेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

RECENT NEWS