मुख्य आरोपीला ७ दिवसांची पोलीस कोठडी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

शाळेतील फसवणूक प्रकरण: मुख्य आरोपीला ७ दिवसांची पोलीस कोठडी

- Advertisement -

इतर आरोपींवर लवकरच कारवाई

चाळीसगाव: प्रतिनिधि जयहिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चाळीसगाव येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ९७.०१ लाख रुपयांच्या अनुदान कपात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणातील मुख्य आरोपी संस्थेचे सचिव अशोक खलाणे यांना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

संमतीपत्रावर जबरदस्तीने सह्या
गटशिक्षणाधिकारी विलास भोई यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. संस्थेचे सचिव अशोक खलाणे, मुख्याध्यापक अभिजीत खलाणे आणि क्लर्क ज्ञानेश्वर महाजन यांनी संगनमताने काही शिक्षकांना धमकावून जबरदस्तीने संमतीपत्रावर सह्या घेतल्या. तसेच, २००६ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत शिक्षकांच्या पगारातून अनुदान कपात करून मोठ्या प्रमाणात आर्थिक अपहार केल्याचे चौकशी अहवालातून स्पष्ट झाले आहे.

शहर पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले, हवालदार विनोद पाटील व भूपेश वंजारी यांच्या पथकाने मुख्य आरोपी अशोक खलाणे यांना अटक केली. १५ मार्च रोजी आरोपीला चाळीसगाव न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभिवक्ता रमेश माने, शशिकांत माने आणि मनोज माने यांनी प्रभावी युक्तिवाद केला. न्यायालयाने आरोपीस २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

इतर आरोपींवर लवकरच कारवाई
या प्रकरणातील इतर आरोपींच्या अटकेसाठी पोलीस कार्यवाही सुरू असून, लवकरच पुढील आरोपींना अटक करण्यात येईल, असे शहर पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी सांगितले.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sand Mafia Jalgaon | वाळू माफियांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका! शिरसोली-कुऱ्हाडदा...

Sand Mafia Jalgaon जळगाव | सुनिल भोळे | शिरसोली ते कुऱ्हाडदा दरम्यान रात्रीच्या सुमारास चालणाऱ्या बेफाम अवैध वाळू वाहतुकीला लगाम घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर...

Adawad Gram Panchaya | अडावद ग्रामपंचायतीत निधी घोटाळ्याचे आरोप;...

Adawad Gram Panchaya यावल | मिलिंद जंजाळे | अडावद ग्रामपंचायतीत १५ वा वित्त आयोग निधीअंतर्गत राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला असून ग्रामपंचायत...

Government Scheme | धरणातील गाळ आता शेतात! आमदार अमोलभाऊ...

Government Scheme रावेर-यावल |  मिलिंद जंजाळे | मतदारसंघात सन २०२६-२७ साठी ‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून...

RECENT NEWS