School Student; निमगाव येथे भुसावळ मार्गावर उसाच्या ट्रॅक्टरखाली आल्याने १२ वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याचे जागीच मृत्यु

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

यावल (प्रतिनिधी) ; – तालुक्यातील निमगाव येथे यावल भुसावल मार्गावरील पाटील यांच्या शेताजवळ च्या रस्त्यावर उस वाहतुक करणाऱ्या भरधाव वेगाने ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने झालेल्या अपघातात १२ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यु .

- Advertisement -

या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की आनंद रघुनाथ सोनवणे वय १२ वर्ष राहणार निमगाव तालुका यावल येथे आज दिनांक २० डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास यावल हुन भुसावळ मार्ग मुक्ताईनगर येथे उस वाहतुक करणाऱ्या या महेन्द्रा कंपनीच्या ट्रॅक्टर क्रमांक एमएच १९डीएफ २५३५ हे यावल कडुन भुसावळ मार्गाने जात असतांना निमगाव जवळ नयनसिंग खुबसिंग पाटील यांच्या शेताजवळील रस्त्यावर उसाने भरलेल्या ट्रॅक्टर हे भरधाव वेगाने जात असतांना ट्रॅक्टरच्या मागीत ट्रॉलीच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली असुन , याबाबत मयताचे काका किरण फकीरा कोळी यांनी यावल पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने ट्रॅक्टर चालक सोनु छोटू पारधे राहणार डोडीकर तालुका चाळीसगाव याच्याविरुद्ध अपघातास कारणीभुत म्हणुन गुन्ह्याची नोंद करण्यात आली असुन , पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी उमेश सानप हे करीत आहे . दरम्यान मयत मुलाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रूग्णालयात डॉ प्रशांत जावळे यांनी केले .

School Student

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Nashirabad Police | दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह...

Nashirabad Police साक्षीदार न्यूज | नशिराबाद | गेल्या काही दिवसांपासून दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका अठरा वर्षीय तरुणाला जेरबंद करण्यात नशिराबाद पोलिसांना यश आले...

Yawal Police | यावल पोलिसांचा मोठा धडाका! रात्रीच्या काँबिंगमध्ये...

Yawal Police यावल | मिलिंद जंजाळे | शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यावल पोलीस स्टेशनतर्फे दिनांक २३ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत विशेष काँबिंग ऑपरेशन...

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

RECENT NEWS