Patanjali Supreme Court ; सुप्रीम कोर्टाने मंगळवारी हर्बल उत्पादने कंपनी पतंजली आयुर्वेदला विविध आजारांसंबंधीच्या औषधांबद्दलच्या जाहिरातींमध्ये ‘खोटे’ आणि ‘भ्रामक’ दावे करीत करण्याविरूद्ध न्यायालयाने ताकीद दिली. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने तोंडी टिपणीमध्ये म्हटले की, ‘पतंजली आयुर्वेदच्या अशा सर्व खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती त्वरित थांबवायला हव्यात. न्यायालय अशा कोणत्याही उल्लंघनाची गांभीर्याने दखल घेईल…’
योगगुरू रामदेव यांच्यावर लसीकरण मोहीम आणि आधुनिक औषधांच्या विरोधात प्रचार केल्याचा आरोप करणाऱ्या आयएमएच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि आयुष मंत्रालय आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड यांना नोटीस बजावली होती. संक्षिप्त सुनावणीदरम्यान, खंडपीठाने पतंजली आयुर्वेदला आधुनिक वैद्यक पद्धतींविरोधात दिशाभूल करणारे दावे आणि जाहिराती प्रकाशित करू नयेत असे सांगितले.
प्रत्येक उत्पादनावर एक कोटी रुपयांचा दंड ठोठावू
न्यायालयाने सांगितले की, खंडपीठ प्रत्येक उत्पादनावर 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्याचाही विचार करू शकते, जर एखाद्या विशिष्ट आजारावर उपचार होऊ शकतो असा खोटा दावा केला गेला. सर्वोच्च न्यायालयाने केंद्राच्या बाजूने उपस्थित असलेल्या वकिलांना दिशाभूल करणाऱ्या वैद्यकीय जाहिरातींच्या समस्येवर तोडगा काढण्यास सांगितले, जेथे विशिष्ट आजारांवर अचूक उपचार करणाऱ्या औषधांबाबत दावे केले जात आहेत.
खंडपीठ पुढील वर्षी ५ फेब्रुवारीला आयएमएच्या याचिकेवर सुनावणी करणार आहे. याचिकेवर नोटीस जारी करताना सर्वोच्च न्यायालयाने अॅलोपॅथी आणि अॅलोपॅथिक प्रॅक्टिशनर्सवर टीका केल्याबद्दल रामदेव यांच्यावर जोरदार टीका केली होती आणि डॉक्टर आणि इतर उपचार पद्धतींची बदनामी करण्यापासून त्यांना रोखले पाहिजे असे म्हटले होते.
काय आहे संपूर्ण प्रकरण ?
तत्कालीन सरन्यायाधीश एनव्ही रमना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले होते, ‘गुरू स्वामी रामदेव बाबांना काय झाले आहे?… त्यांनी योग लोकप्रिय केल्यामुळे आम्ही त्यांचा आदर करतो. आपण सगळे करतो. पण, त्यांनी दुसऱ्या पद्धतीवर टीका करू नये. खंडपीठाने म्हटले होते की, “आयुर्वेद, ते कोणत्याही पद्धतीचा अवलंब करत असले तरी चालेल याची काय हमी आहे? तुम्ही अशा जाहिराती पाहतात ज्यात सर्व डॉक्टरांना खुनी असल्यासारखे आरोपी केले जाते. ‘मोठ्या जाहिराती दिल्या आहेत’ आयएमएने अनेक जाहिरातींचा हवाला दिला होता ज्यात अॅलोपॅथ आणि डॉक्टरांना चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आले होते.