साक्षीदार | ५ नोव्हेबर २०२३
राज्यातील विधी क्षेत्रातील तरुणांसह तरुणीसाठी नोकरीबाबतची एक मोठी भरती समोर आली आहे. अनेक तरुणांना या बातमीच्या माध्यमातून नोकरी देखील मिळू शकते. महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण म्हणजेच महारेरा अंतर्गत वरिष्ठ कायदेशीर सल्लागार, कनिष्ठ कायदेशीर सल्लागार, महारेरा फेलोशिप पदाच्या १० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
या भरतीसाठी उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करता येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ नोव्हेंबर २०२३ आहे. तर भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्जाची पद्धत आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
पदाचे नाव – वरिष्ठ कायदेशीर सल्लागार, कनिष्ठ कायदेशीर सल्लागार, महारेरा फेलोशिप.
एकूण पद संख्या – १० जागा
शैक्षणिक पात्रता –
वरिष्ठ कायदेशीर सल्लागार – LLB
कनिष्ठ कायदेशीर सल्लागार – LLB
महारेरा फेलोशिप – MBA
नोकरीचे ठिकाण – मुंबई
अर्जाची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल करण्याचा पत्ता – techoff2@maharera.mahaonline.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ नोव्हेंबर २०२३