mahayuti sarkar
साक्षीदार | १० ऑक्टोबर २०२३ | राज्यात राजकारणात शिवसेनेतून बाहेर पडत एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत सत्तेत बसले होते त्यानंतर अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी भाजप-शिवसेना सरकारला पाठिंबा देत मंत्रीपदाची शपथ घेतली. आज अजित पवारांना सत्तेत सहभागी होऊन १०० दिवस पुर्ण झाले. त्यानंतर अनेकदा अजित पवार यांच्या नाराजीच्या चर्चा सुरु असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्र लिहिलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुती सरकारमध्ये सामील होऊन, आज १०० दिवस पूर्ण झाले आहेत. यानिमित्तानं आपल्या सर्वांशी साधलेला हा पत्रसंवाद.#वसाविकासाचा_विचारबहुजनांचा pic.twitter.com/cdzpoI6dGr
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 10, 2023
अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या जनतेला उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. अजित पवार गट युती सरकारमध्ये सामील होऊन आज 100 दिवस पूर्ण झाले आहेत. यानिमित्ताने अजित पवारांनी जनतेला पत्र लिहिलं आहे. दरम्यान या पत्रामध्ये स्वत:चा उल्लेख त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष असा उल्लेख केला आहे. यात त्यांनी युती सरकारच्या कामकाजाचा संपुर्ण लेखाजोखा मांडलेला आहे.