जामनेर (अशोकराव चव्हाण) ; – पहूर ता.जामनेर येथून जवळच असलेल्या पिंपळगांव कमानी येथे हरितक्रांतीचे प्रणेते,आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार,महानायक तथा माजी मुख्यमंत्री-स्व.वसंतरावजी नाईकसाहेब यांची १११’वी जयंती दि.१’जुलै रोजी संस्थेच्या मुख्य कार्यालयामधे उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते-मा.राजूभाऊ चव्हाण आणि वरीष्ठ संचालक-मा.गणेशभाऊ राठोड यांच्याहस्ते कै.वसंतरावजी नाईकसाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष तथा पोलिस पाटील-मा.इंदलभाऊ चव्हाण आणि उपसरपंच तथा संचालक-मा.संदिपभाऊ राठोड यांनी कै.वसंतरावजी नाईकसाहेब यांच्या सामाजिक,शैक्षणिक व राजकीय जिवन कार्याविषयी माहिती उपस्थित समाजबांधवांना दिली.याप्रसंगी,मा.ईश्वरभाऊ चव्हाण,मा.रमेशभाऊ राठोड,मा.उदलभाऊ चव्हाण,मा.भंगराजभाऊ राठोड ,मा.राजेशभाऊ राठोड यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन-मा.उदलभाऊ चव्हाण यांनी केले आणि संचालक तथा उपसरपंच-मा.संदिपभाऊ राठोड यांनी आभार मानले.








