Guna Bus Fire Accident: मध्य प्रदेश मधील गुना जिल्ह्यात रात्रीला एकभीषण अपघात झाला हा अपघात बुधवारी रात्री एका डंपरने बसला धडक दिल्यावर बस ला भीषण आग लागली या आगीत 13 जणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला आहे . या अपघातात 17 प्रवासी जखमी झाले. जखमींना जवळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती प्रशासना कडून कळविण्यात आले आहे .
या सविस्तर माहिती अशी कि , गुना-आरोन या रोडवर रात्री 9 वाजेच्या सुमारास समोरून येणाऱ्या एका डंपरने एका प्रवासी बसला धडक दिली हि धडक इतकी जोरदार हि जागेवरच पलटी झाली आणि या बसला आग लागली हि आग इतकी भीषण होती कि बस पूर्ण जाळून खाक झाली आहे .
बीजपीचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. मोहन यादव यांनी ट्वीट करीत सांगितले आहे कि, “गुना ते आरोनला जाणाऱ्या बसला भीषण आग लागल्याने प्रवाशांचे नुकसान झाल्याची बातमी कळाल्यावर अत्यंत दुःखद आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांच्या प्रती दुःख व्यक्त करतो. आणि घडलेल्या या दु:खाच्या परिस्थितीत राज्य सरकार हि अपघातात मरण पावलेल्या आणि जखमी कुंबीयांच्या पाठीशी भक्कम उभे आहे.” (Latest Marathi News)
त्यांनी पुढे सांगितले आहे की, “भविष्यात अशा अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी मी प्रशासनाला जखमी प्रवाशांवर योग्य ते उपचार करण्याची तसेच अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.”
आर्थिक मदतीची केली घोषणा
बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपये आणि गंभीर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत करण्याचे आदेश देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासना कडून तात्काळ देण्याचे आवडेश दिलेले आहे . यावर केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी देखील “घटनेची माहिती मिळताच मी जिल्हाधिकारी आणि एसपी (पोलीस अधीक्षक) यांच्याशी बेलने झालेलं आहे आणि त्यांना घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहे .