back to top
रविवार, एप्रिल 20, 2025

Eknath Khadse ; एकनाथ खडसेंसह कुटुंबियांना १३७ कोटींची नोटीस ; काय आहे प्रकरण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

साक्षीदार न्युज ; – मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड या शिवारातील भूखंडामधून एका टेकडीवरून अवैध उत्खनन केल्या प्रकरणी आमदार एकनाथराव खडसे आणि त्यांचे कुटुंबिय हे अडचणीत सापडले आहे . याबाबत तहसीलदारांनी दंडाची नोटीस देखील बजावलेली आहे .

- Advertisement -

या बाबत सविस्तर माहिती अशी कि , आमदार एकनाथराव खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांची मालकी असलेली सातोड शिवारा लगत एका जमीनीतून मोठ्या टेकडी मधून मोठ्या प्रमाणात मुरुमाचे अवैध्य उत्खनन करण्यात आल्याचा आरोप मुक्ताईनगचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला होता. या बाबत त्यांनी विधानसभेत देखील प्रश्‍न उपस्थित केला होता . या अवैध्य मुरमाच्या उत्खनन प्रकरणी तब्बल चारशे कोटी रूपयांच्या गौणखनिजाचे उत्खनन केले असल्याचे त्यांनीसांगितले होते . हा सर्व मुरूम हा महामार्गाच्या कामासाठी वापरण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. या आरोपावर महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी एसआयटी नेमण्याची घोषणा देखील केली होती. या संपूर्ण प्रकारांची एसआयटीने चौकशी करून प्रत्यक्ष उत्खनन किती केले ? याचे मोजमाप देखील करण्यात आले होते .

एसआयटीने केलेल्या चौकशी नतंर आलेल्या रिपोर्टच्या माध्यमातून मुक्ताईनगरच्या तहसीलदारांनी खडसे कुटुंबियांना नोटीस बजावली आहे . त्यानुसार अवैधरित्या उत्खनन केलेल्या गौण खनिजासाजही किंमत हि २६ कोटी एक लाख १२ हजार ११७ इतकि दाखविण्यात आलेली असून नियमानुसार याच्या पाचपट दंडाची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार एकूण १३७ कोटी १४ लाख ८१ हजार ८८३ रुपयाचा दंड आकारण्याबाबत ही नोटीस बजावन्यात आली आहे. या प्रकरणात आमदार एकनाथ खडसे यांच्यबरोबर खासदार रक्षा खडसे, मंदाकिनी खडसे व रोहिणी खडसे, रक्षा खडसे यांच्यासह इतर जमीन मालकांना देखील नोटीस बजाविण्यात आली आहे . मुक्ताईनगर तहसीलदारांनी ६ ऑक्टोबर रोजी ही नोटीस बजावली आहे. या नोटीसीमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण आले आहे . या प्रकरणात पुढे काय होते याबाबाबत सर्वांना उत्सुकता लागलेली आहे .

Eknath Khadse

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Rohit Pawar | रोहित पवारांचं आवाहन: ‘फक्त ठाकरे नव्हे,...

 Rohit Pawar साक्षीदार न्युज । महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक वेगळीच चर्चा सुरू आहे. मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यातील संभाव्य युतीच्या संकेतांनी राजकीय वातावरण...

Income Tax Return | आयकर रिटर्नसाठी ‘ही’ कागदपत्रे आवश्यक;...

Income Tax Return साक्षीदार न्युज । नवीन आर्थिक वर्ष 2024-25 ची सुरुवात झाली असून, आता नोकरदार आणि इतर करदाते गेल्या आर्थिक वर्षातील आयकर विवरणपत्र...

UttarPradesh Mother Elopes With Daughters Father In Law |...

UttarPradesh Mother Elopes With Daughters Father In Law साक्षीदार न्युज । एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ४३ वर्षीय महिलेने आपल्या मुलीच्या ४६...

RECENT NEWS