motorcycle theft ; यावल मोटरसायकल चोरी प्रकरणी १८ आरोपींना पोलीस कोठडी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

यावल ( साक्षीदार न्युज ) ; – येथील मोटरसायकल चोरी प्रकरणी यावल पोलिसांनी गोपनियरित्या तपासाची चक्रे फिरवुन १८ आरोपींना अटक करण्यात आली असुन या सर्व आरोपींना न्यायालयाने दिनांक १६ पर्यंत एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असुन पोलीसांनी केलेल्या या मोठया मोटरसायकल चोरी पर्दाफास च्या प्रकरणात आंतरराज्य टोळीशी लागेबांधे असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे .

- Advertisement -

या संदर्भात मिळालेली माहिती अशी यावलच्या पोलीस ठाण्यात मागील सप्टेंबर महीन्यात शहरातील कुंभारटेकडी परिसरातुन चोरीस गेलेल्या ट्रेक्टर चोरीच्या गुन्ह्याचा पोलीसांकड्डन शोध घेतले जात असतांना पोलीसांच्या हाती मोटरसायकल चोरी करणाऱ्या चोरांची टोळीच हाती लागल्याने पोलीसांनी केलेल्या चोरट्यांवर कारवाईमुळे तालुक्यात सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे .

या मोटरसायकल चोरी प्रकरणी पोलीस उपअधिक्षक डॉ कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांनी लावलेल्या मोटरसायकल चोरीच्या तपासात १३ मोटरसायक जप्त केल्या असुन यात पोलिसांनी संशयीत आरोपी म्हणुन अर्जुन सुरेश कुंभार अशरफ उर्फ गोलु कलींदर तडवी, जावेद खान अशरफ खान,सागर उर्फ उमेश जितेन्द्र सपकाळे,देविदास उर्फ साहिल तलेश बारसे, विशाल दिलीप वाणी विनोद दौलत कुंभार , उमेश झग्ग्रु घारू, संजय भगवान भोई , हर्षल सदांनद गजरे ,रविन्द्र सुरेश कुंभार ,आकाश राजु कुंभार, सुरेश आनंदा कुंभार ,राजेश कडू महाजन सर्व राहणार यावल आणी रविन्द्र पंढरी कोळी राहणार दहिगाव तालुका यावल यांना अटक करण्यात आली असुन , या सर्व संशयीत आरोपींना पोलीसांनी न्यायालयात हजर केले असता न्या. एस बी वाळके यांनी दिवसाची पोलीस कोठडीत ठेण्याचे आदेश दिले आहे .

- Advertisement -

या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात पोलीसांनी राज्यासह मध्यप्रदेश आणी गुजरात मोटरसायकल जप्त केल्या असुन या मोटरसायकल चोरीच्या वाहन प्रकरणात आंतरराज्य टोळी असण्याची शक्यता पोलीसांनी व्यक्त केली आहे .

Motorcycle theft

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS