Girl Molested
सावदा (साक्षीदार न्युज ) ; – शहरातील 19 वर्षीय तरुणीचा विनयभंग रावेर तालुक्यातील सावदा येथील एका भागात राहणाऱ्या 19 वर्षे चोरणीचा हात पकडून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दिनांक २४ जून रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली याप्रकरणी मंगळवारी दिनांक 25 जून रोजी दुपारी दीड वाजता सावदा पोलीस ठाण्यात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की सावदा येथील 19 वर्षे तरुणी आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे दरम्यान सोमवारी 24 जून रोजी सकाळी 11 वाजता तरुणी घरात एकटी असताना गावात राहणारा संशयित शकील शब्बीर मोहम्मद वय वर्ष 38 हा घरात घुसलाआणि तरुणीचा हात पकडून तिच्यासोबत अश्लील चाळे करून तरुणीचा विनयभंग केला , झालेला हा सर्व प्रकार पिढीत तरुणीने आपल्या नातेवाईकांना सांगितल्यावर त्यांनी सावदा पोलीस ठाण्यात घेऊन तक्रार दिली . पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादी वरून संशयित शकील शब्बीर मोहम्मद यांच्या विरोधात सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास सावदा पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश पाटील हे करीत आहे.