साक्षीदार | ३ नोव्हेबर २०२३ | अनेक लोकांकडे अजून देखील २ हजाराची नोट आहे, पण अनेकांना प्रश्न पडला असेल कि हि नोट कुठे जमा करावी, तर हि बातमी त्यांच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. बाजारातील दाेन हजार रुपयांच्या चलनी नाेटा परत आणण्यासाठी पाेस्ट ऑफिसमध्ये जमा करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. पाेस्ट ऑफिसमध्ये नाेटा जमा केल्यानंतर ती रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल, असे आरबीआयने म्हटले आहे.
आता बँकेने नवा पर्याय अशा लाेकांसाठी उपलब्ध करून दिला आहे जे आरबीआयच्या विभागीय कार्यालयांपासून लांब राहतात. पाेस्ट ऑफिसात जमा केलेल्या नाेटा आरबीआयच्या विभागीय कार्यालयात पाठविण्यात येतील. त्यासाठी एक अर्ज भरुन द्यावा लागेल. ही रक्कम त्यानंतर त्यांच्या खात्यात जमा हाेईल.