Minister Gulabrao Patil ; जत 29 गावे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 205 कोटी रुपये उपलब्ध – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

पाण्याचे शाश्वत स्त्रोत निश्चित करून कामे मार्गी लावा

- Advertisement -

जलजीवन मिशन अंतर्गत धुळे, नाशिक जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनातील कामांना गती द्यावी

Minister Gulabrao Patil मुंबई, (साक्षीदार न्युज )दि.२१:- जत 29 गावे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 205 कोटी रुपये उपलब्ध असून पाण्याचे शाश्वत स्त्रोत निश्चित करून कामे मार्गी लावा. जलजीवन मिशन अंतर्गत धुळे, नाशिक जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनातील कामांना गती द्यावी असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

- Advertisement -

👉🏽 जळगावात देश सोडण्याच्या का दिल्या नोटीस

विविध जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांतील कामांच्या स्वतंत्र आढावा बैठका मंत्रालय येथे झाल्या. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर , आमदार विक्रम सावंत यासह प्रधान सचिव संजय खंदारे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, कार्यकारी अभियंता श्रीमती पलांडे, कार्यकारी अभियंता विजय वाईकर, एस सी निकम, यासह संबंधित गावातील लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सांगली जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. पाटोळे यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

मंत्री श्री.पाटील यांनी पाणीपुरवठा योजनातील जल जीवन मिशन अंतर्गत सुरु कामांविषयी लोकप्रतिनिधींकडून आलेल्या सूचनाची दखल घेतली. यावेळी पाणीपुरवठा मंत्री श्री पाटील म्हणाले , सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ प्रकल्प अंतर्गत जत 29 गावांसाठी सुरू असलेल्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 205 कोटी रुपये निधी मंजूर आहे. सदर 29 गावांपैकी ज्या गावांना शाश्वत स्रोत नाहीत त्या गावांसाठी पाण्याचे शाश्वत स्त्रोत निश्चित करून कामे पूर्ण होण्यासाठी गती दिली जावी. संबंधित लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी एकत्रित चर्चा करून बाबी निश्चित कराव्यात. ग्रामपंचायत कडून स्वीकृती व लोकवर्गणीचे ठरावबाबत अडचण येणाऱ्या गावातील अडथळे दूर करण्यात यावे असे सांगितले.

यासह मंत्री महोदय यांनी धुळे जिल्ह्यातील कापडणे, सोनगीर, बेटावद , मसदी , सामोडे आणि जिल्हा परिषद अंतर्गत सुरू असलेल्या जल जीवन मिशन अंतर्गत कामांचा स्वतंत्ररीत्या आढावा घेतला. सोनगीर येथील काम या महिन्याअखेरीस पूर्ण होणार आहे. तर मसदी येथील दोन तीन महिन्यात पूर्ण होईल. धुळे जिल्हा परिषद अंतर्गत 560 कामे पूर्ण झाले असून “हर घर नल से जल” साठी घोषित करण्यात आली आहे यापैकी 104 कामे प्रमाणित झाले आहेत. शिथीलता आलेल्या कामांना गती देण्यासाठी अधिकाऱ्यांनी अशा ठिकाणी सतत भेट देऊन वेळेत कामे व्हावी त्यासाठी पाठपुरावा करावा अशा सूचना मंत्री श्री पाटील यांनी यावेळी दिल्या.

शिंदखेडा व येवला तालुक्यातील कामांची स्थिती असमाधानकारक असून शिंदखेडा येथील काम सहा महिन्यापासून बंद आहे, याबाबत नाराजी व्यक्त करून संबंधित कंत्राटदारास नोटीस बजावून पुढील कारवाई करण्याचे, निर्देश पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

Minister Gulabrao Patil

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS