Talathi Recruitment Result ; नागपूर तलाठी भरती परीक्षेचा निकाल ५ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आला आहे . भूमी अभिलेख विभागाकडून ६ डिसेंबर रोजी तलाठी शेवटच्या उत्तरपत्रिका जाहीर केली होती. या आधी २८ सप्टेंबर २०२३ रोजी तलाठी उत्तरपत्रिका व त्यासोबतच उमेदवारांना आक्षेप घेण्यासाठी काही कालावधी देखील देण्यात आला होता.
तलाठी भरतीचा निकाल लागताच धक्कादायक प्रकार समोर आला आहे . स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडून या निकालावर आक्षेप घेण्यात आला आहे . निकालामध्ये प्रचंड गोंधळ झाला आहे आणि जे विध्यार्थी जुन्या परीक्षेत नापास झाले होते त्यापैकी काही उमेदवार हे या परीक्षेत दोनशेहून अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाल्याचा आरोप केला आहे. तसेच ज्या काही उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत असे उमेदवार देखील परीक्षेत पास झाल्याचा आरोपही करण्यात आलेला आहे. त्यामुळे तलाठी भरती पुन्हा भरती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने त्यांच्या एक्सवर केलेल्या आरोप केलेला आहे कि चक्क एकाच व्यक्तीचे दोन नोकाल देण्यात आले आहे .परीक्षांमध्ये पण फक्त १५ दिवसांचा गॅप असेल. वनरक्षक मध्ये ५४ गुण आणि तलाठीमध्ये २०० पैकी २१४ गुण घेऊन टॉप केलेले आहे. यावरून हेच समजते कि पेपर कसे झालेआहे आणि त्यात मार्क कसे पडले आहेत . ९९ टक्के जागा ह्या विकल्या गेलेल्याआहेत. यात सर्व निवड करण्यात आलेल्या मुलांची न्यायालयीन एसआयटीमार्फत चौकशी करण्यात अली पाहिजे . तसेच या सर्व मुलांनी कोणत्या सेंटरवर पेपर दिलेला आहे आणि यांची रॉ मार्क किती आहेत हे देखील सर्वांना समजले पाहिजे. या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही हे पब्लिक व्हायला पाहिजे . ह्या काळातील सर्वात मोठा घोटाळा हा तलाठी भरतीमध्ये झाला आहे, असा आरोपहि त्यांनी केलेला आहे .
तलाठी भरतीत मोठा घोटाळा झाल्याचे आमचे आधीपासूनच मत होते . परीक्षेचा निकालानंतर आम्ही केलेलं आरोप हे सत्य होतांना दिसत आहे . तलाठी भरतीत ज्या मुलांवर आधी पेपरफुटीचे गुन्हे दाखल झालेले होते , त्यातील अनेक मुलांना १९० पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. आणि यात काही मुले असे आहेत कि ज्यांच्यावर गुन्हे दाखल असताना देखील चारित्र पडताळणीचे प्रमाणपत्र हे देखील खोटे जोडलेले आहेत , ते व्हेरिफिकेशन वेळेस दाखऊन दुसऱ्या पदावर नोकरी करत आहेत. त्यामुळे ह्या झालेल्या सर्व प्रकारची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.