साक्षीदार | २० नोव्हेबर २०२३ | रावेर शहरातील एका महिलेचा दोन वेगवेगळ्या ठिकाणी लज्जास्पद वर्तन केले व जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी एकाविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- Advertisement -
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका २२ वर्षीय महिलेचा आठवडे बाजारात पाठलाग करून व मदिना कॉलनीतील शादीखाना हॉलमध्ये १९ नोव्हेंबर रोजी लग्न समारंभात तिच्याशी लज्जास्पद वर्तन करून मोबाइल नंबर लिहून घेण्याचा आग्रह संशयित आरोपी शाहरूख खान हुसेन (रा. इमामवाडा, रावेर) याने विनयभंग केल्याची फिर्याद देण्यात आली आहे. तपास फौजदार सचिन नवले हे करीत आहे.
- Advertisement -