साक्षीदार | ९ ऑक्टोबर २०२३ | भडगाव तालुक्यातील कजगाव येथे केळी लागवडीसाठी जमीन तयार करीत असताना विजेचा शॉक लागून २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना घुसर्डी ता.पाचोरा येथे रविवारी सकाळी घडली.
- Advertisement -
मिळालेल्या माहितीनुसार, घुसर्डी येथील विकास धर्मा निकुंभ (वय २३) असे या मृत तरुणाचे नाव आहे. रविवारी सकाळी तो काका राजेंद्र निकुंभ, चुलतभाऊ साई व यश निकुंभ यांच्यासोबत केळी लागवडीसाठी जमीन तयार करीत होता. त्याचवेळी त्याला वीज तारेचा शॉक बसला. त्यात तो बेशुद्ध पडला. काका व चुलतभावांनी त्यास कजगाव येथील खासगी दवाखान्यात आणले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, काका, चुलत भाऊ असा परिवार आहे.
- Advertisement -