अयोध्येत पुजारी पदासाठी ३ हजार आले अर्ज !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २१ नोव्हेबर २०२३ | देशात प्रभू श्री रामाचे सर्वात मोठे मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेल्या अयोध्या नगरीमधील मंदिराचे काम पुर्ण झाले असून आता २२ जानेवारी २०२४ ला नववर्षाच्या सुरूवातीलाच मोठ्या जल्लोषात राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. त्याआधी अयोध्येतील राम मंदिरामध्ये पुजारी पदासाठी आत्तापर्यंत तब्बल ३ हजार अर्ज आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामधील २०० उमेदरावांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, राम मंदिरामध्ये पुजारी पदासाठी आत्तापर्यंत ३००० अर्ज आल्याची माहिती अयोध्येच्या राम मंदिर विश्वस्त मंडळाचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी यांनी दिली आहे. त्यापैकी २०० जणांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले असून सध्या त्यांच्या मुलाखती असल्याचेही ते म्हणाले.

अयोध्येतील विश्व हिंदू परिषदेचे (व्हीएचपी) मुख्यालय कारसेवक पुरम येथे या सर्व उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. त्यांची मुलाखत अयोध्येचे दोन महंत मिथिलेश नंदिनी शरण आणि सत्यनारायण दास तसेच वृंदावनचे जयकांत मिश्रा यांच्या तीन सदस्यीय पॅनेलद्वारे घेतली जात असल्याची माहितीही गोविंद देव गिरी यांनी दिली. मुलाखतीला उपस्थित झालेल्या 200 उमेदवारांपैकी 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल ज्यांना 6 महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर राम मंदिराचे पुजारी म्हणून नियुक्त केले जाईल. तसेच, त्यांना वेगवेगळ्या पदांवर तैनात केले जाईल. ट्रस्टचे खजिनदार गोविंद देव गिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यांची ट्रस्टने निवड केलेली नाही, तेही ६ महिन्यांच्या प्रशिक्षणात सहभागी होऊ शकतात. प्रशिक्षणानंतर त्यांना प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS