प्रिन्स घोड्याला लागली ३० लाखांची बोली ; काय आहे विशेष !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | ४ नोव्हेबर २०२३ | राज्यातील सणासुदीच्या काळात नेहमीच अनेक जिल्ह्यात घोडेबाजार रंगत असतो. त्यातील महत्वाचा मानला जाणारा घोडेबाजार म्हणजे अकलूज येथे असतो. कार्तिकी यात्रा आणि दिवाळीच्या निमित्ताने गेल्या १४ वर्षापासून या गावात घोडेबाजार भरत असतो. यंदा देखील देशभरातील जातिवंत घोड्यांनी बाजार चांगलाच बहरला आहे. मात्र या सगळ्यात आकर्षण ठरतोय तो पंबाजचा प्रिन्स घोडा. दिसायला पांढराशुभ्र उंच अन् देखणा असलेल्या या घोड्याला तब्बल ३० लाखांची बोली लागली आहे.

- Advertisement -

अकलूजच्या कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये दरवर्षी घोडे बाजार भरतो. यंदा बाजारात उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, हरियाना, बिहार, गुजरात या राज्यातून मारवाडी, काटेवाडी, पंजाबी असे नामवंत जातीचे सुमारे एक हजाराहून अधिक घोडे विक्रीसाठी दाखल झाले आहेत.

एक लाखापासून ते 30 लाख रूपये किंमतीचे घोडे बाजारात दाखल झाले आहेत. हा घोडे बाजार सुमारे दोन महिने चालतो. या काळात सुमारे पाच कोटी रूपयांची आर्थिक उलाढाल होते. यंदा उत्तर प्रदेशातून आलेला पंजाब जातीचा प्रिन्स घोडा बाजाराचे मुख्य आकर्षण ठरला आहे. या घोड्याला तब्बल 30 लाख रूपयांची बोली लागली.
रंगाने पांढरा शुभ्र, चमकदार डोळे, उभे कान ऐटीत चालणारा… रूंद पाठ असा देखणा पंजाबी जातीचा प्रिन्स अकलूजच्या घोडे बाजारात सर्वांचेच लक्ष वेधत आहे. अवघ्या दोन वर्षांच्या प्रीन्सची उंची सहा फूट असून तो तीन देव मनाचा आहे. त्याच्या गळ्यावर तीन देव मन (लहान भोवरे) असणे भाग्याचे लक्षण समजले जाते. त्यामुळे या घोड्याला मोठी मागणी आहे.

- Advertisement -

प्रिन्सला दररोज पाच लिटर दूध आणि चार किलो चना दाळ असा खुराक दिला जातो. घरात समृद्धी नांदावी आणि वैभव वाढावे यासाठी हौशी लोक याची खरेदी करतात. त्यामुळे अशा घोड्यांना बाजारात मोठी मागणी होते असते. पहिल्याच दिवशी प्रिन्स घोड्याला 30 लाखांची मागणी झाल्याचे बाजार समितीचे सचिव राजेंद्र काकडे यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Nashirabad Police | दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह...

Nashirabad Police साक्षीदार न्यूज | नशिराबाद | गेल्या काही दिवसांपासून दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका अठरा वर्षीय तरुणाला जेरबंद करण्यात नशिराबाद पोलिसांना यश आले...

Yawal Police | यावल पोलिसांचा मोठा धडाका! रात्रीच्या काँबिंगमध्ये...

Yawal Police यावल | मिलिंद जंजाळे | शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यावल पोलीस स्टेशनतर्फे दिनांक २३ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत विशेष काँबिंग ऑपरेशन...

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

RECENT NEWS