MLA Mangeshdada Chavan ; ओझर येथील रेडिमेड गारमेंट युनिट मध्ये मिळाला ३० महिलांना रोजगार,आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा पुढाकार, माविम चा उपक्रम

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

MLA Mangeshdada Chavan शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.प्रतिभाताई चव्हाण यांच्याहस्ते युनिट चे उद्घाटन

- Advertisement -

चाळीसगाव (साक्षीदार न्युज ) ; – महिला आर्थिक विकास महामंडळाच्या नवतेजस्विनी प्रकल्प अंतर्गत तालुक्यातील ओझर शिवारात रेडिमेड गारमेंट युनिट सुरू करण्यात आले आहेत. यात तालुक्यातील ३० महिलांना स्वयंरोजगार मिळाला असून त्याचे नुकतेच शिवनेरी फाउंडेशन च्या अध्यक्षा सौ.प्रतिभाताई मंगेश चव्हाण यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले.

MLA Mangeshdada Chavan

- Advertisement -

यावेळी माविम जळगाव चे उपजीविका तज्ञ प्रशांत पाटील, व्यवस्थापक आशिष मोरे, चाळीसगाव कोओर्डीनेटर राजश्री राजपूत, कर्मचारी पंकजा बागुल, रंजना अहिरे आदी उपस्थित होते.

सदर प्रकल्पासाठी शासनाकडून सबसिडी उपलब्ध होती मात्र जागा नसल्याने गेली अनेक वर्षे हा प्रकल्प सुरू होत नव्हता. ही बाब आम्ही आमदार मंगेशदादा चव्हाण यांना सांगितली असता त्यांनी आपली ओझर येथील लावण्या सिटी मधील खाजगी जागा निशुल्क उपलब्ध करून दिली. त्यामुळे आज हा प्रकल्प सुरू होऊ शकला असल्याची भावना अभियानाच्या कोओर्डीनेटर राजश्री राजपूत यांनी व्यक्त केली.

MLA Mangeshdada Chavan

सदर रेडिमेड गारमेंट युनिट मध्ये
31 मशीन असून 30 महिला यावर शिलाई करतील, त्यांच्यावर 3 ट्रेनर लक्ष ठेवून असणार आहेत.
सद्यस्थितीत शाळेचे गणवेश शिलाई काम सुरू असून प्रति नग प्रमाणे महिलाना मजुरी दिली जात आहे.

MLA Mangeshdada Chavan

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS