३२ वर्षीय महिलेची लाखो रुपयात फसवणूक ; वाचा काय घडली घटना !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | ९ नोव्हेबर २०२३ | पार्ट टाइम जॉब देण्याचे आमिष दाखवून त्यासाठी टास्क पूर्ण करा, असे सांगत प्रियंका प्रवीण जैन (३२, रा. भुसावळ) यांची पाच लाख ८९ हजार ७९४ रुपयांची फसवणूक करण्यात आली. यात नोकरी तर मिळाली नाही, शिवाय हातची रक्कमही गेली. याप्रकरणी निधी व अमित असे नाव सांगणाऱ्या दोघांविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ येथील गृहिणी असलेल्या प्रियंका जैन यांच्याशी १९ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर दरम्यान वेळोवेळी निधी व अमित, अशी नावे सांगणाऱ्या दोघांनी संपर्क साधत त्यांना पार्ट टाइम जॉबचे आमिष दाखविले. त्यासाठी एक टास्क दिला व तो पूर्ण होण्यासाठी खाते रिचार्जच्या नावाने वेळोवेळी रक्कम स्वीकारली. सुरुवातीला जैन यांना १६ हजार ७८० रुपये व नंतर ३५ हजार २४५ हजार रुपये पाठवून विश्वास संपादन केला. दोघांनी वेळोवेळी एकूण सहा लाख ४१ हजार ८१९ रुपये ऑनलाइन स्वीकारले. त्यापैकी केवळ ५२ हजार २५ रुपये परत मिळाले. त्यामुळे त्यांची पाच लाख ८९ हजार ७९४ रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी प्रियंका जैन यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे करीत आहेत…

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

Heart Attack | धक्कादायक! धावत्या दुचाकीवरच तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराचा...

Heart Attack यावल | मिलिंद जंजाळे | यावल शहरातील अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चोपडा नाक्याजवळ एका ३२ वर्षीय तरुणाचा धावत्या दुचाकीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने...

RECENT NEWS