दोन बंद घर फोडून ४३ हजारांचा ऐवज लांबविला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव ; – शहरातील समता नगर येथील वंजारी टेकडीजवळ दोन बंद घर फोडून घरातील सामानांची तोडफोड करत ४३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना शनिवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता समोर आली आहे. याप्रकरणी रविवारी ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील समता नगर परिसरातील वंजारी टेकडी जवळ ईश्वर रामदास चव्हाण व त्यांच्या घराशेजारी त्यांचे चुलत भाऊ अजय प्रल्हाद चव्हाण हे वास्तव्याला आहे. दरम्यान त्यांचे घर बंद असतांना अज्ञात चोरट्याने दोन्ही घराचे दरवाजाचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत घरातील वस्तूंची तोडफोड केली आणि घरातील गॅस सिलेंडर, इलेक्ट्रिक मोटर पंप, टीव्ही, होम थिएटर, घरातील भांडी आणि दुचाकी असा एकूण ४३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. हा प्रकार शनिवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता समोर आला. दरम्यान हा प्रकार लक्षात आल्यानंतर ईश्वर चव्हाण यांनी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार रविवारी ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुशील चौधरी हे करीत आहे.

breaking two closed house

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Nashirabad Police | दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह...

Nashirabad Police साक्षीदार न्यूज | नशिराबाद | गेल्या काही दिवसांपासून दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका अठरा वर्षीय तरुणाला जेरबंद करण्यात नशिराबाद पोलिसांना यश आले...

Yawal Police | यावल पोलिसांचा मोठा धडाका! रात्रीच्या काँबिंगमध्ये...

Yawal Police यावल | मिलिंद जंजाळे | शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यावल पोलीस स्टेशनतर्फे दिनांक २३ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत विशेष काँबिंग ऑपरेशन...

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

RECENT NEWS