साक्षीदार | १३ ऑक्टोबर २०२३ | जळगाव जिल्ह्यातील अनेक गावात अल्पवयीन मुलीसह महिलावर विनयभंग केल्याची घटना उघडकीस येत असतांना एका ४७ वर्षीय महिलेला तुझे घरकुलचे काम मंजूर करून देतो म्हणत एकाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एका विरोधात भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील एका गावात ४७ वर्षीय महिला वास्तव्यास असून दि.२६ जुलै ते ११ ऑक्टोबर २०२३ या दरम्यान संशयित आरोपी हा महिलेला तुझे घरकुलचे काम मंजूर करून देईल तु मला शारीरिक सुख दे असे बोलून महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी महिलेने भडगाव पोलिसात धाव घेत संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ.तात्याबा नगरे हे पुढील तपास करीत आहेत.