साक्षीदार | २७ ऑक्टोबर २०२३ | देशातील अनेक राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाले आहे तर मध्य प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश महाराष्ट्र सीमेवर शेरीनाका येथे तब्बल सहा लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ही रक्कम पाल, ता. रावेर येथील एका व्यापाऱ्याची असल्याचे समोर आले.
मध्य प्रदेशात पुढील महिन्यात विधानसभा निवडणुका आहेत. यामुळे मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी पैसा, मद्य तसेच शस्त्रास्त्रांच्या संशयास्पद वाहतुकीला आळा घालण्यासाठी आंतरराज्य सीमेवर पोलिसांची नाकाबंदी केली आहे. यावेळी पाल येथील व्यापाऱ्याकडून ५,९७,००० रुपये जप्त करण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकात महाजन, सुरेश मोरे, शैलेंद्र शर्मा यांनी ही कारवाई केली. ही रोकड जप्त करून संबंधित विभागाच्या कार्यालयात पाठवण्यात आली आहे. पाल येथील रहिवासी असलेल्या तीन जणांना याबाबत खरगोन पोलिसांनी बोलावले आहे.
महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवर जप्त – करण्यात आलेली सहा लाखांची रक्कम पाल येथील एका व्यापायाची असल्याचे मध्य प्रदेश पोलिसांनी सांगितले. या रकमेबाबत संबंधित पोलिसांकडून रितसर पावती देण्यात आली आहे. पाल येथील व्यापारी मध्य प्रदेशात बकच्या खरेदी करण्यासाठी जात असताना सीमेवर ही रक्कम जप्त करण्यात आली.