रेल्वे कर्मचाऱ्याची ६५ हजारांची ऑनलाईन फसवणूक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

भुसावळ ; – रेल्वे विभागात नोकरीला असलेल्या तरूणाच्या क्रेडीटकार्ड खात्यातून ऑनलाइन माध्यमातून तब्बल ६५ हजार ५०९ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी अखेर शुक्रवारी ५ जानेवारी रोजी दुपारी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात २ मोबाईल धारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सलमान खान कायमखानी (वय-२९) रा.गजानन महाराज नगर भुसावळ हे आपला परिवारासह वास्तव्याला असून ते रेल्वे विभागात नोकरीला आहे. रविवारी ३१ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता त्यांना अनोळखी दोन मोबाईल क्रमांकावरून फोन आला. त्यात त्यांनी सांगितले की “आम्ही क्रेडिट कार्डच्या बँकेतील कस्टमर केअर एक्झिक्यूटिव्ह म्हणून बोलत असल्याचे सांगत तुमच्या क्रेडिट कार्ड जॉइनिंगचे चार्जेस ९ हजार ९९९ रुपये परत करण्याचे आहे, असे सांगून त्यांनी एक लिंक पाठवली. त्या लिंकचे स्टेप फॉलो करायला सांगितले. त्यानुसार सलमान खान यांनी दिलेल्या लिंकवर क्लिक करून स्टेप फालो करत गेले. त्यावेळी अज्ञात मोबाईल धारकाने ऑनलाइन पद्धतीने २ ट्रान्झेक्शन करून एकूण ६५ हजार ५०९ रुपये किमतीची ऑनलाईन फसवणूक केली. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी बँकेत चौकशी केली, परंतु त्याबाबत त्यांना काहीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी शुक्रवारी ५ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 Railway Online Fraud 

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS