साक्षीदार | १७ ऑक्टोबर २०२३ | देशभरातील अनेक उच्च शिक्षित तरुणासाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. ज्यांना संरक्षण संशोधन क्षेत्रात आवड असेल त्यांच्यासाठी हि बातमी आनंदाची असणार आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था भरती व मूल्यांकन केंद्र (RAC) अंतर्गत शास्त्रज्ञ सी, वैज्ञानिक डी, वैज्ञानिक ई, शास्त्रज्ञ एफ पदाच्या एकूण ५१ रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि वयोमर्यादा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
पदाचे नाव – शास्त्रज्ञ सी, वैज्ञानिक डी, वैज्ञानिक ई, शास्त्रज्ञ एफ.
एकूण पद संख्या – ५१
पदानुसार पद संख्या –
शास्त्रज्ञ सी – २७
वैज्ञानिक डी – ८
वैज्ञानिक ई – १४
शास्त्रज्ञ एफ – २
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात अवश्य पाहा.
वयोमर्यादा – ४० ते ५० वर्षे.
अर्जाची पद्धत्त – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ नोव्हेंबर २०२३
अधिकृत वेबसाईट – rac.gov.in
पगार –
शास्त्रज्ञ सी – ६७ हजार ७०० रुपये.
वैज्ञानिक डी – ७८ हजार ८०० रुपये.
वैज्ञानिक ई – १ लाख २३ हजार १०० रुपये.
शास्त्रज्ञ एफ – १ लाख ३१ हजार १०० रुपये.