बंद घर फोडून ८१ हजारांचा ऐवज लांबविला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव ; – समता नगर परिसरात राजू किराणा दुकाना समोरील बंद घर फोडून घरातील चांदीच्या वस्तू आणि रोकड असा एकूण ८१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून दिल्याची घटना शनिवारी दुपारी समोर आली आहे. या संदर्भात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

रामानंदनगर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रतिभा चंद्रकांत बनसोडे वय-४० रा.राजू किराणा दुकानासमोर, समता नगर, जळगाव या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवारी ६ जानेवारी रोजी कामाच्या निमित्ताने त्यांनी घर बंद करून बाहेर गेल्या होत्या. दरम्यान घर बंद असल्याचे फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी सकाळी ८.३० ते दुपारी २.३० वाजेच्या दरम्यान घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत कपाटात ठेवलेले ७१ हजारांची रोकड आणि १० हजार रुपये किमतीच्या चांदीच्या पाटल्या असा एकूण ८१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. दुपारी अडीच वाजता प्रतिभा बनसोडे ह्या घरी आल्या. त्यावेळी त्यांना घरात सामान अस्तव्यस्त पडलेला दिसून आला. घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार सायंकाळी ७ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय सपकाळे हे करीत आहे.

Breaking House

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS