Police Control साक्षीदार न्युज । सुनिल भोळे ।आम्ही आपल्याला मागील आठवड्यात दाखविले होते कि , वाळू व्यावसायिकांशी पोलिसांचे आर्थिक हितसबंध आहेत अशी एक पोस्ट माहिती अधिकार तथा सामाजिल्हा कार्यकर्ता दीपक गुप्ता यांनी त्यांच्या फेसबुक पेजला टाकली होती आणि याचीचा बातमी साक्षदिर न्युज ने प्रसारित केली होती . पोलिसांचा सहभाग असल्याचा आरोप झालेल्या नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर झाला होता आणि याच चौकशीसाठी करण्यासठी त्यांची तात्पुरत्या स्वरुपात मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. यामध्ये जळगाव उपविभागातील पाच पोलिस स्टेशनसह स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. असा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ माहेश्वर रेड्डी यांनी काढलेले आहेत .
हि बातमी जरूर बघा
👉🏽 दिपक गुप्तांचा वाळू चोरीचा गौप्य स्फोट
महसूल पथकाने केले पोलिसांचे काम परंतु साहेब म्हणतात आम्हाला माहीतच नाही
वाळू व्यावसायिकांशी पोलिस कर्मचाऱ्यांचे हितसंबंध असल्याचा आरोप होत होते आणि तशी यादीदेखील सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली होती. या संपूर्ण घटनेची गंभीर दाखल घेत पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी या सर्वांना मुख्यालयात बदली करण्याचे आदेश काढले आहेत . यात जळगाव एमआयडीसी, तालुका, शनिपेठ, रामानंद नगर, जिल्हापेठ, एलसीबी व शहर पोलिस ठाणे अशा अनेक पोलिस ठाण्यातील नऊ जणांच्या चौकशीसाठी त्यांची तात्पुरत्या स्वरुपात मुख्यालयात बदली करण्यात आले आहे. या उचलबांगडी झाल्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे .
काय होणार या सर्वांवर कारवाई Police Control
पिंप्राळा येथी हुडको परिसरात एका तरुणाचा खून झाला होता आणि यात पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले होते . या तरूणाचा प्रेमविवाहातून झालेल्या खुनाच्या घटनेनंतर हल्लेखोरांना एक पोलिस मदत करीत आहे असा आरोप नातेवाईंकडून करण्यात आला होता . त्या विषयी देखील संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांना दिले आहे. या घटनेची चौकशी करून अहवाल मागविन्यात आला आहे आणि जर का चौकशी अहवालात काही तथ्य आढळले तर संबंधितांवरही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी दिले आहेत .