शुल्लक कारणाने जळगावात १० वर्षीय मुलाला मारहाण !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २६ ऑक्टोबर २०२३ | गटारीत पडलेली चप्पल काढून देण्यास नकार दिल्याने तीन ते चार अल्पवयीन मुलांनी वेदांत प्रशांत चिंचोरे ( धनगर, १० वर्षे, रा. शिवाजीनगर) या बालकाच्या मानेवर, पाठीवर व डोक्यात लोखंडी पट्टीने अमानुषपणे मारहाण केली. ही घटना सोमवार रात्री शिवाजीनगरात घडली. यात बालक जखमी झाला असून मारहाण करणाऱ्या अल्पवयीन मुलांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

शहरातील शिवाजीनगरातील रिक्षा चालक प्रशांत चिंचोरे हे वास्तव्यास आहे. त्यांचा मुलगा वेदांत हा सोमवारी रात्री घराबाहेर असताना त्याला काही मुलांनी गटारीत पडलेली चप्पल काढण्यास सांगितली. परंतु वेदांतने गटारीतील पडलेली चप्पल काढण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या १४ ते १५ वर्षे वयोगटातील तीन ते चार अल्पवयीन मुलांनी लोखंडी पट्टीने वेदांतच्या मानेवर, पाठीवर व डोक्याच्या मागील बाजूस मारहाण करुन दुखापत केली. यामध्ये वेदांत गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. या प्रकरणी बालकाच्या वडिलांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात तीन ते चार मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक अश्विनी इंगळे करीत आहेत.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS