जळगावात ३१ वर्षीय व्यापाऱ्याला मारहाण करीत लुटले !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २७ ऑक्टोबर २०२३ | जळगाव शहरातील रेल्वे स्थानकासमोरील रिक्षा स्टॉपजवळ नशिराबाद येथील ३१ वर्षीय व्यापाऱ्याला शिवीगाळ व मारहाण करत गळ्यातील ९७ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन ओढून नेल्याची घटना बुधवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रात्री ९ वाजता जळगाव शहर पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे भूषण हिरालाल चौधरी (वय ३१) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. व्यापार करून तो आपला उदरनिर्वाह करतो. बुधवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास कामाच्या निमित्ताने जळगाव रेल्वेस्थानकासमोरील रिक्षा स्टॉप येथे आलेला होता. त्यावेळी चेतन दिलीप येवले (वय १९) आणि अविनाश विजय रंधे (वय २५) यांनी कारण नसताना भूषण चौधरी याला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील ९७ हजार रुपये किमतीची तीन तोळ्याची सोन्याची चेन जबरी हिसकावून पसार झाले. हा प्रकार घडल्यानंतर भूषणने जळगाव शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी चेतन दिलीप येवले आणि अविनाश विजय रंधे (दोन्ही रा. नशिराबाद) यांच्या विरोधात जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि बशिर तडवी करीत आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

Heart Attack | धक्कादायक! धावत्या दुचाकीवरच तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराचा...

Heart Attack यावल | मिलिंद जंजाळे | यावल शहरातील अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चोपडा नाक्याजवळ एका ३२ वर्षीय तरुणाचा धावत्या दुचाकीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने...

RECENT NEWS