९ वर्षीय बालकाच्या छातीत आसारी घुसून मृत्यू !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | १४ नोव्हेबर २०२३ | एरंडोल शहरातील हिमालय पेट्रोलपंपमागील परिसरात नगरपालिकेच्या एका बांधकामाच्या ठिकाणी खेळत असताना ९ वर्षीय बालकाच्या छातीत आसारी घुसून धक्कादायक मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दि.१३ रोजी संध्याकाळी उघडकीस आली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल शहरातील हिमालय पेट्रोल पंपामागील रहिवासी विशाल रविंद्र गायकवाड (वय ९) असे मयत बालकाचे नाव असून तो आई, वडील, लहान भाऊ- बहीण यांच्यासह राहतो. हातमजुरी करून त्याचा परिवार उदरनिर्वाह करतात. एरंडोल नगरपालिकेचे हिमालय पेट्रोलपंपामागे गटारीचे ढापे टाकायचे काम सुरु आहे. तेथे काही आसाऱ्या उघड्यावर धोकादायक स्थितीत ठेवलेल्या होत्या. सोमवारी विशाल त्याच्या मित्रांसह तेथे खेळत असताना अचानक तो पडला आणि एक आसारी त्याच्या छातीत घुसली. यामुळे आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत त्याला खाजगी रुग्णालयात उपचाराला नेले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मयत घोषित केले.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

RECENT NEWS