Sickle Cell | सिकलसेल सप्ताह निमित्त जिल्ह्याला रक्तदान शिबिराचे आयोजन.

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Sickle Cell | साक्षीदार न्यूज | जळगाव महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत 11 डिसेंबर पासून सिकलसेल सप्ताह साजरा केला जात असून, त्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल व जळगाव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जि.प.जळगाव येथे आज रक्तदान शिबिर पार पडले.
शिबिरामध्ये तालुका सर्व आरोग्य अधिकारी, सर्व आरोग्य सेवा कर्मचारी, समुदाय आरोग्य अधिकारी, व इतर विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला.
याबाबत अधिक माहिती देतांना डॉ.सचिन भायेकर यांनी सांगितले की सिकलसेल,थॅलेमेमीया तशा रक्ताची निगडित आजाराने बाधित असलेल्या रुग्णांना नियमित रक्ताची गरज भासत असते, अशा सर्व गरजू रुग्णांना रक्ताची कमतरता भासू नये, म्हणून हे रक्तदान शिबिर आयोजित केलेले असून, रक्तदान हे सर्वात मोठे श्रेष्ठदान असल्याने, वर्षातून किमान दोन वेळा तरी प्रत्येक नागरिकांने… रक्तदान हे करावे असे आवाहन सदर प्रसंगी डॉ.भायेकर यांनी केले व स्वतः डॉ. भायेकर यांनी देखील रक्तदान करून सहभाग नोंदवला.

- Advertisement -

सदर शिबिराच्या प्रसंगी जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.रमेश धापते, डॉ. प्रमोद पांढरे, डॉ.बाळासाहेब वाबळे, डॉ.सुपे आदी सर्व वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी तथा
इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखील रक्तदान केले.

सदर रक्तदान शिबिर यशस्वी होण्याकरिता विशेषतः शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव यांची रक्तपेढीची सर्व टीम,
आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच जळगाव जिल्हा सिकलसेल समन्वयक टीम यांनी विशेष परिश्रम घेतले.

बोदवड शहरातील अवैध देशीदारू वाईन शॉप यांना नगरपंचायतचे अभय : हरिदास गनबास
महापालिका निवडणुकांसाठी राजकीय गणिते बदलली! मुंबईत ठाकरे एकत्र, पुण्यात पवारांची युती ठरली?
31 डिसेंबरसाठी घरीच दारूची पार्टी करता तर मग सावधान! घरात किती दारू ठेवू शकता ? वाचा नियम
गर्भवती महिलांनी शिवलिंगाची पूजा करावी का? शास्त्र काय सांगते, जाणून घ्या संपूर्ण सत्य
नगराध्यक्षांना किती पगार मिळतो? A, B, C वर्गातील नगरपरिषदांचे मानधन आणि भत्त्यांचा सविस्तर खुलासा
दारू पिल्यानंतर या 3 गोष्टी चुकूनही खाऊ नका; हँगओव्हर वाढतो आणि तब्येत बिघडू शकते

Sickle Cell

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Yawal News | यावलमध्ये पाण्यासाठी महिलांचा आक्रोश! ५ किमीवरून...

Yawal News यावल |  मिलिंद जंजाळे| तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, वॉर्ड क्रमांक १, दुसरखेडा रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या काही वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र...

Gold Price | सोन्याच्या दरात मोठी घसरण! अजून किती...

Gold Price | साक्षीदार न्यूज | मार्च महिन्यात सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय घसरण नोंदवली गेली असून गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. Kedia...

Hindu Muslim Unity | साकळीतील ईद मिलाद सोहळ्यात हिंदू-मुस्लिम...

Hindu Muslim Unity यावल | मिलिंद जंजाळे | साकळी (बऱ्हाणपूर–अंकलेश्वर रोड) येथे मेश ऍग्रो कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेला ईद मिलाद सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात आणि...

RECENT NEWS