Court Order ; न्यायालयाच्या आदेशाने चौघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Court Order ;  साक्षीदार न्युज । सुनिल भोळे । जळगाव शहरातील जुने जळगाव परिसरात असलेल्या खळे प्लॉटवरील बांधकामवरून वाद झाला होता. वादात एका महिलेला शिवीगाळ करून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली दि.२७ जुलै रोजी घडली होती. याप्रकरणी महिलेने न्यायालयात दावा दाखल केल्यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शनिपेठपोलिसात चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, जुने जळगावातील एका परिसरात असलेल्या खळे प्लॉटवर महिलेकडून कायदेशीररित्या बांधकाम केले जात होते. यावेळी दि.२७ जुलै रोजी त्या परिसरात राहणाऱ्या चौघांनी बांधकामास अडथळा निर्माण करण्यास सुरुवात केली. महिलेने त्यांना दस्ताऐवज दाखविले. मात्र तरी देखील बांधकाम करण्यास मज्जाव करीत साहीत्याची नासधूस केली. महिलेचा भाऊ हा समजूत काढण्यासाठी त्याठिकाणी आला असता, त्याला चौघांनी शिवीगाळ करीत मारहाण केली.

महिला भावाला चौघांच्या तावडीतून सोडवित असतांना त्या चौघांनी महिलेसोबत अश्लिल वर्तन करीत तिचा विनयभंग केला होता. दरम्यान, महिला तक्रार देण्यासाठी पोलिसात गेल्या मात्र पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतली नाही. महिलेने तक्रार दिल्यानंतर केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे महिलेने तक्रारीसाठी न्यायालयात दावा दाखल केला होता.

- Advertisement -

न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार संशयित राजेश सोमा खडके, किशोर सोमा खडके, प्रशांत खडके, प्रकाश सोमा खडके यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर करीत आहेत.

Court Order

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

Heart Attack | धक्कादायक! धावत्या दुचाकीवरच तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराचा...

Heart Attack यावल | मिलिंद जंजाळे | यावल शहरातील अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चोपडा नाक्याजवळ एका ३२ वर्षीय तरुणाचा धावत्या दुचाकीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने...

RECENT NEWS