- Advertisement -
साक्षीदार | १९ ऑक्टोबर २०२३
जळगाव शहरापासून नजीक असलेल्या आव्हाणे येथील गिरणा नदीपात्रात पाय घसरून एका १२ वर्षीय बालकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. तालुका पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
- Advertisement -
वैभव नरेंद्र पाटील असे मृत झालेल्या बालकाचे नाव आहे. वैभव हा सहावीच्या वर्गात शिकत होता. मंगळवारी दुपारी ३ वाजता घरातून निघाला होता. सायंकाळी उशिरापर्यंत वैभव घरी न आल्यामुळे नातेवाइकांनी वैभवचा शोध घेतला. गावात व शेतीशिवारात शोध घेतल्यावर देखील वैभव आढळून आला नाही. त्यामुळे मंगळवारी रात्री उशिरा नातेवाइकांनी तालुका पोलिस स्टेशनला मिसिंगची नोंद केली होती.
- Advertisement -