साक्षीदार | २८ नोव्हेबर २०२३ | जळगाव शहरातील नवीन बसस्थानक परिसरात एका ४० वर्षीय अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील नवीन बस स्थानक परिसरात एका ४० वर्षीय अनोळखी तरुणाचा मृतदेह सोमवारी २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारासआढळून आला. त्याला रुग्णवाहिकेतून तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी सीएमओ डॉ. निरंजन देशमुख यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताने चॉकलेटी रंगाचे टी शर्ट व खाकी रंगाची पॅन्ट परिधान केली आहे. तरी मयताची ओळख पटविण्याचे आवाहन तपासधिकारी पोलीस हेड कॉन्सटेबल महेंद माळी यांनी केले आहे.