साक्षीदार | २४ ऑक्टोबर २०२३ | भुसावळ तालुक्यातील एका गावात पतीने पत्नीवर चाकूचे वार करून तिला जखमी केल्याची घटना घटना रविवारी संध्याकाळी घडली आहे. याप्रकरणी पतीविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील गोजोरे गावात सुरेखा अजय सपकाळे कोळी (३०) ही रविवारी सायंकाळी घराबाहेर बसली असतांना याच वेळी पती संशयित आरोपी अजय सपकाळे याने दारूच्या नशेत धारदार चाकूने पत्नी सुरेखावर वार केला. यात ती जखमी झाली. तिला खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. छाया अमृत सोनवणे (६०, रा. गोजोरा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीवायएसपी कृष्णात पिंगळे, तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक बबन जगताप, सहायक पो. नि. अमोल पवार यांनी घटनास्थळी भेट दिली.