साक्षीदार | २७ ऑक्टोबर २०२३ | देशभरातील अनेक व्हिडीओ गेल्या काह्ही वर्षापासून सोशल मिडीयावर व्हायरल होत असतात. त्याच्यातील काही व्हिडीओ हे मजेशीर असतात तर काही संतापजनक असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर धुमाकूळ घातला आहे. या व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. रस्त्याच्या एका बाजूला वाहनांची भली मोठी रांग लागली आहे. या वाहनांच्या रांगेमध्ये बस देखील उभी राहिलेली दिसत आहे. तर रस्त्याची दुसरी बाजू मोकळी दिसत असून याठिकाणावरून वाहनं व्यवस्थित जात आहेत. अशातच याच बाजूने येणारा दुचाकीस्वार रस्त्यावरील वाहतूक कोंडी पाहतो. या वाहतूक कोंडीला बस चालक देखील जबाबदार असल्याचे पाहून हा तरूण संतापतो.
तो रस्त्यामध्येच आपली दुचाकी उभी करून सुरूवातीला बस चालकाशी काही तरी बोलतो. अशामध्ये दोघांच्यामध्ये बाचाबाची होते. त्यानंतर हा तरूण दुचाकीवरून उतरून हेल्मेट काढून चालकाला शिवीगाळ करत बसमधून खाली उतरायला सांगतो. त्यानंतर तो बस चालकाला मारण्याचा प्रयत्न करतो. त्याचवेळी आणखी दोन तरुण त्याठिकाणी येतात आणि ते देखील बचचालकाला शिवीगाळ करत बसवर मारू लागतात. बसमधील सर्व प्रवासी हे भांडण पाहत असताना दिसत आहे.
Kalesh b/w a Bike-Rider and Bus Driver over bus was blocking the road for other Vehicles in Keralapic.twitter.com/PMVXgboO0A
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) October 25, 2023
शेवटी बसचालक वैतागून बसमधून खाली उरतो. पण तोपर्यंत हा तरुण दुचाकी घेऊन घटनास्थळावरून पळून जातो. तरूणाने भररस्त्यात केलेल्या या राड्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र व्हिडिओमध्ये दिसत आहे. बसमधील एका प्रवाशाने हा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताच अवघ्या काही तासांतच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला @gharkekalesh या ट्वीटर अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ केरळमधील असल्याचे सांगितले जात आहे. देशभरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत चालली आहे. त्यात वाहतूक कोंडीदरम्यान अशाप्रकारची भांडणं आणि हाणमारी अनेकदा होत असतात. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे आपण आतापर्यंत पाहिले आहे.