जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : दिवाळीच्या सुट्टीत गावी जाणे पडले महागात !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २१ नोव्हेबर २०२३ | दिवाळी साजरी करण्यासाठी गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारला. ही घटना सोमवार दि. १३ नोव्हेंबर रोजी पिंप्राळा परिसरातील गौरव पार्कमध्ये उघडकीस आली. त्यांच्या घरातील ड्रॉवरचे लॉक तोडून चोरट्यांनी २० हजारांची रोकड लंपास केली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळा परिसरातील गौरव पार्कमध्ये गणपत व्यंकटराव धुमाळे (वय-४२) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. दिवाळी निमित्त गणपत धुमाळे हे दि. १० नोव्हेंबर रोजी परिवारासह मुळगावी लोणी ता. देगलूर जि. नांदेड येथे घराला कुलूप लावून गेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद घराचे कूलप तोडून आत प्रवेश करत घरातील टेबलाच्या ड्राव्हरमध्ये ठेवलेले २० हजारांची रोकड चोरून नेली. शेजारच्यांच्या लक्षात आली घटना गणपत धुमाळे यांच्या शेजारी राहणारे रमेश बोरसे यांना गणपत धुमाळे यांच्या घराचे दरवाजावरील लॉक तुटलेले दिसले. त्यानुसार घरात चोरी झाल्याबाबत धुमाळे यांना कळविले. त्यानंतर धुमाळे हे दि. १९ नोव्हेंबर रोजी घरी आले तेव्हा घरात सर्व सामान पसरलेला दिसून आला. टेबल्याच्या ड्रॉव्हरमधून २० हजार रूपयांची चोरी झाल्याचे निदर्शनास आले. धुमाळे यांनी सोमवारी रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sand Mafia Jalgaon | वाळू माफियांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका! शिरसोली-कुऱ्हाडदा...

Sand Mafia Jalgaon जळगाव | सुनिल भोळे | शिरसोली ते कुऱ्हाडदा दरम्यान रात्रीच्या सुमारास चालणाऱ्या बेफाम अवैध वाळू वाहतुकीला लगाम घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर...

Adawad Gram Panchaya | अडावद ग्रामपंचायतीत निधी घोटाळ्याचे आरोप;...

Adawad Gram Panchaya यावल | मिलिंद जंजाळे | अडावद ग्रामपंचायतीत १५ वा वित्त आयोग निधीअंतर्गत राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला असून ग्रामपंचायत...

Government Scheme | धरणातील गाळ आता शेतात! आमदार अमोलभाऊ...

Government Scheme रावेर-यावल |  मिलिंद जंजाळे | मतदारसंघात सन २०२६-२७ साठी ‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून...

RECENT NEWS