चारचाकीची पुलाच्या कठड्याला धडक ; एक जागीच ठार !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | १२ नोव्हेबर २०२३ | भरधाव वेगाने चारचाकी पुलाच्या कठड्याला धडकल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास जानवे गावाजवळ घडली.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील गिरणा पंपिंगजवळील रहिवासी भगवान दलपत सपकाळे ( वय ६३) हे विजया भगवान कोळी (५५) आणि कुंतला भगवान कोळी (२४) यांना चारचाकी (एमएच १९ एएक्स ६४५३) वर अमळनेरहून धुळ्याकडे जात होते. वेगाने वाहन चालवल्याने जानवे गावाजवळ हॉटेल फाल्गुनीच्याजवळ पुलाच्या कठड्याला चारचाकी धडकली. त्यानंतर उलटून त्यात भगवान सपकाळे जागीच ठार झाले. विजया आणि कुंतला कोळी दोन्ही गंभीर जखमी झाल्या. परिसरातील ग्रामस्थांच्या मदतीने १०८ रुग्णवाहिकेने त्यांना उपचारासाठी धुळे जिल्हा सरकारी रुग्णालयात रवाना करण्यात आले.

घटनेचे वृत्त कळताच सहायक पोलिस निरीक्षक हरिदास बोचरे व हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे यांनी घटनास्थळी पंचनामा केला. पोलिस पाटील विलास पाटील यांच्या फिर्यादीवरून मयत भगवान सपकाळे यांच्याविरुद्ध स्वतःच्या मृत्यूस व दोघांना जखमी करण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय पाटील करीत आहेत.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS