साक्षीदार | २३ ऑक्टोबर २०२३ | राज्यभरतील अनेक कॉमर्स पदवीधरांना नोकरीसाठी महत्वाची अपडेट समोर आली आहे. आयडीएफसी फर्स्ट बँकेत ऑडिट एक्झिक्युटिव्हच्या रिक्त जागांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. रिक्त जागा बिझिनेस प्रोसेसमधील असल्याने त्या पदावर काम करताना संबंधित उमेदवाराला बँकेच्या अंतर्गत लेखा परीक्षणातही मदत करावी लागेल. वार्षिक वेतन 3 ते 9 लाख रुपये असेल. नोकरीचे ठिकाण इंदूर आहे.
या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे बी.कॉम किंवा बीईची पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय एमबीए फायनान्स किंवा सीएमधील पदव्युत्तर उमेदवारही या पदासाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील. फ्रेशर्स किंवा अंतर्गत ऑडिटमधील अनुभवी उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. आयडीएफसी फर्स्ट बँकेत ऑडिट एक्झिक्युटिव्हच्या पोस्टसाठी काम करीत असताना, निवड झालेल्या उमेदवाराला ऑडिटची व्याप्ती परिभाषित करण्यासाठी ऑडिट व्यवस्थापकास मदत करावी लागेल. याशिवाय लेखांकन दस्तऐवजीकरण, अहवाल, डेटा, फ्लोचार्टचे विश्लेषण आणि मूल्यमापनाची कामगिरी पार पाडावी लागेल.
मान्य वेळेनुसार ऑडिट योजना अंमलात आणणे, मसुदा तयार करणे आणि ऑडिट अहवाल तयार करण्यातही मदत करावी लागेल. मुख्य क्षेत्रांमध्ये ऑपरेशनल कौशल्य विकसित करण्याची जबाबदारी सुद्धा पेलावी लागेल. लेखापरीक्षकांसोबस व्यावसायिक संबंध विकसित करून ते टिकवून ठेवावे लागतील. प्रत्येक तिमाहीत केलेल्या लेखापरीक्षणासाठी लेखापरीक्षण समितीसमोर सादरीकरणे तयार करण्यास मदत करावी लागेल. चुकीचे, असामान्य किंवा फसव्या कर रिटर्नचे संकेतांक शोधण्याची कामे देखील करावी लागतील. जारी केलेल्या लेखापरीक्षण अहवालांच्या अनुपालनाचा सक्रियपणे पाठपुरावा करणे आणि दस्तऐवज प्रक्रिया आणि ऑडिट शोध ज्ञापन तयार करण्याचे काम करावे लागेल.