साक्षीदार | १ नोव्हेबर २०२३ | देशभरातील अनेक उच्च शिक्षित तरुणांना सरकारी नोकरीसाठी एक मोठी संधी समोर आली आहे. कर्नाटकातील ग्रामीण पेयजल व स्वच्छता विभागात 155 रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. पात्र उमेदवारांना देण्यात येणारी नोकरी ही कंत्राटी पद्धतीची असली तरी त्यांना 50 हजार ते 75 हजार महिना पगार मिळेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2023 आहे.
प्रोक्योरमेंट कन्सल्टंटच्या 31, देखरेख आणि मूल्यांकन सल्लागारच्या 31, पर्यावरण कन्सल्टंटच्या 31, सोशल डेव्हलपमेंटच्या 31, फायनान्स कन्सल्टंटच्या 31, अशा एकूण 155 रिक्त जागांसाठी ग्रामीण पेयजल व स्वच्छता विभागात भरती होत आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीई/बी.टेक/बीसीए/एम.टेक/एमएसडब्ल्यू/एमए/एमबीए (फायनेंस),एम.कॉमची पदवी संपादन केलेले उमेदवार नोकरीसाठी पात्र ठरतील.
किमान 21 आणि कमाल 45 वर्ष वयाची अट पूर्ण करणारे उमेदवार अर्ज करू शकतील. निवड झाल्यानंतर पात्र उमेदवारांना 50 ते 75 हजार रूपये मासिक वेतन मिळेल. पात्र उमेदवारांची निवड ही कागदपत्रांची पूर्तता व थेट मुलाखतीद्वारे केली जाईल. अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर उमेदवाराला मेनू बारमध्ये जाऊन भरती किंवा करियर विभाग निवडावा लागेल. त्यानंतर ग्रामीण पेयजल व स्वच्छता विभाग कर्नाटक जाहिरात डाऊनलोड करावी लागेल. आवश्यक कागदपत्रे आणि छायाचित्रे अपलोड केल्यावर फी भरावी लागणार आहे. संपूर्ण प्रक्रिया झाल्यावर पुढील आवश्यकतेसाठी भरलेल्या फार्मची प्रिंट काढता येईल.
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख : 04 नोव्हेंबर 2023