back to top
शुक्रवार, सप्टेंबर 26, 2025

आ.खडसेंच्या अडचणी वाढल्या ; तब्बल १३७ कोटींची दंडाची नोटीस !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

साक्षीदार | १९ ऑक्टोबर २०२३ | राज्याच्या राजकारणात नेहमीच आपल्या विधानाने चर्चेत असलेले राष्ट्रवादीचे आ.एकनाथ खडसे यांच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली आहे. अवैध गौण खनिज उत्खनात त्यांना 137 कोटीची दंडाची रक्कम नोटीस मुक्ताईनगर तहसीलदारांनी बजावली आहे. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला होता.

- Advertisement -

खडसे परिवारातील सदस्यांच्या नावाने सातोड शिवारात ३३ हेक्टर ४१ आर. जमिनीची खरेदी करण्यात आली होती. याप्रकरणी अवैधरीत्या १ लाख १८ हजार २०२ १५८ ब्रास मुरूमाचे उत्खनन व वाहतूक केल्याप्रकरणी आमदार एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्यासह ६ शेतजमीन मालकांना १३७ कोटींपेक्षा अधिक रकमेच्या दंडाची नोटीस मुक्ताईनगर बजावली आहे. मुक्ताईनगर तहसीलदारांनी ६ ऑक्टोबर रोजी या नोटिसा बजाविल्या आहेत. त्यानुसार अवैधरीत्या उत्खनन केलेल्या गौण खनिजाचे मूल्य २६ कोटी १ लाख १२ हजार ११७ इतके आहे. यापोटी पाच पटींनी दंडाची रक्कम निश्चित करण्यात आली देऊ. आहे. त्यानुसार १३७ कोटी १४ लाख ८१ हजार ८८३ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Heavy Rain | “मुसळधार पावसाने घेतले 84 जीव! मृतांच्या...

Heavy Rain | साक्षीदार न्यूज | राज्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर मानवहानी आणि संपत्तीचे नुकसान झाले असून, शासनाने तत्काळ मदतकार्य सुरू केले आहे....

Pandit Deendayal Upadhyay | पंडीत दीनदयाल उपाध्याय जयंती निमित्त...

Pandit Deendayal Upadhyay | साक्षीदार न्यूज | भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत महत्त्वाचा वाटा असणारे, एकात्मवाद व अंत्योदय विचारांचे प्रणेते "स्व.पंडित दीनदयाल उपाध्याय" यांच्या जयंती निमित्त...

Agriculture Officer | “शेतकऱ्यांचे संसार पाण्यात, मात्र कृषी अधिकारी...

Agriculture Officer | सुनिल भोळे | जळगाव जिल्ह्यात अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतीतील उभी पिके पाण्याखाली गेली, अनेकांच्या घरांचे नुकसान...

RECENT NEWS