जळगावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग तर पालकांना मारहाण !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | ३० ऑक्टोबर २०२३ | शहरातील एका परिसरातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला अश्लील हातवारे करीत, तिचा विनयभंग करण्यासह याविषयी जाब विचारण्यासाठी गेलेल्या पीडित मुलीच्या कुटुंबाला मारहाण करून गंभीर दुखापत करण्यात आली. ही घटना शनिवार, २८ ऑक्टोबर रोजी रात्री घडली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, खान्देश मिल कॉलनी परिसरात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी एका बांधकामाच्या ठिकाणी कुटुंबासह राहते. याच परिसरात राहणारे दोन जण गेल्या काही महिन्यांपासून या अल्पवयीन मुलीकडे पाहून अश्लील हावभाव करीत तिची छेड काढत होते. शनिवार, २८ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही मुलगी रस्त्याने घरी जात असताना या दोघांनी तिचा हात पकडून विनयभंग केला. याचा जाब विचारण्यासाठी पीडित मुलीचे वडील गेले असता, त्याचा राग आल्याने दोघांनी व त्यांच्या अनोळखी मित्रांनी त्यांना तसेच मुलीच्या आईला विटांनी मारहाण केली.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Yawal News | यावलमध्ये पाण्यासाठी महिलांचा आक्रोश! ५ किमीवरून...

Yawal News यावल |  मिलिंद जंजाळे| तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, वॉर्ड क्रमांक १, दुसरखेडा रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या काही वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र...

Gold Price | सोन्याच्या दरात मोठी घसरण! अजून किती...

Gold Price | साक्षीदार न्यूज | मार्च महिन्यात सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय घसरण नोंदवली गेली असून गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. Kedia...

Hindu Muslim Unity | साकळीतील ईद मिलाद सोहळ्यात हिंदू-मुस्लिम...

Hindu Muslim Unity यावल | मिलिंद जंजाळे | साकळी (बऱ्हाणपूर–अंकलेश्वर रोड) येथे मेश ऍग्रो कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेला ईद मिलाद सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात आणि...

RECENT NEWS