जिल्ह्यातील अल्पवयीन मतीमंद मुलगी गरोदर !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | १८ ऑक्टोबर २०२३ | जळगाव जिल्ह्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मतीमंद मुलीवर अनोळखी आरोपीने अत्याचार करीत तिला ५ महिन्याची गर्भवती केल्या प्रकरणी पिंपळगाव(हरे.) पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व घटनेची माहिती परिवाराला रुग्णालयात तपासणी करण्यासाठी गेले असता तेव्हा समजल्याने परिवाराला मोठा धक्का बसला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार पाचोरा तालुक्यातील एका गावात ४० वर्षीय वडील आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. ते परिसरातील शेतात मजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. दि. १६ मे २०२३ रोजी पासून ते दि. १६ ऑक्टोबर २०२३ या दरम्यान ते नियमित मजुरी कामासाठी जात असतांना त्यांच्या घरी १६ वर्षीय मतीमंद मुलगी हि घरीच असायची याच वेळी संशयित आरोपीने तिच्या मतीमंद असल्याचा फायदा घेत मुलीसोबत चुकीचे कृत्य करून तिला ५ ते ६ महिन्याचे गर्भवती केल्याची प्रकार उघडकीस आला आहे. ज्यावेळेस मुलीच्या पोटाचा घेर वाढू लागला त्यावेळी मुलीच्या पालकांनी तिला जळगाव शहरातील सरकारी रुग्णालयात तपासणी करण्यासाठी आणले असतांना त्यांना हि घटना समजल्यावर धक्काच बसला. त्यानंतर त्यांनी लागलीच पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरे.) पोलिसात दि.१७ ऑक्टोबर रोजी धाव घेत अनोळखी संशयित आरोपी विरोधात अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार हे करीत आहेत.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS