साक्षीदार | १३ नोव्हेबर २०२३ | ब्रह्मखल- यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील सिल्कयारा आणि दंड लगाव दरम्यान बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याचा एक भाग रविवारी पहाटे कोसळला आणि सुमारे ४० कामगार आत अडकले, असे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले, रविवारी सकाळपासून बचावकार्य हाती घेण्यात आले आहे. मात्र, अद्याप कोणतेही यश मिळालेले नाही. तथापि, आत अडकलेल्यांनी ते सुरक्षित असल्याचे संकेत पाठवले आहेत, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) आणि पोलिसांनी अपघाताची माहिती मिळताच शोध आणि बचाव मोहीम सुरू केली, असे पोलिस अधीक्षक (उत्तरकाशी) अर्पण यदुवंशी यांनी सांगितले. हे कामगार बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील आहेत. सुमारे १६० बचावकर्ते ड्रिलिंग उपकरणे आणि उत्खनन यंत्रांच्या मदतीने अडकलेल्या मजुरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत