भररस्त्यावर प्रवाशी रिक्षा पेटली !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | १३ ऑक्टोबर २०२३ | जळगाव शहरातील पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाजवळ चालत्या प्रवाशी रिक्षाने पेट घेतल्याची घटना गुरूवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. मनपाच्या अग्निशमन विभागाच्या पथकाने धाव घेवून ही आग आटोक्यात आणली. तो पर्यंत रिक्षा जळून खाक झाली होती. आग मक्या कोणत्या कारणामुळे लागली याची माहिती समोर आलेली नाही.

- Advertisement -

शहरातील पिंप्राळा येथील रेल्वे उड्डाणपुला जवळून गेलेल्या रस्त्यावर गुरूवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास जळगावातून पिंप्राळा येथे जात असलेल्या (एमएच १९ व्ही ३४८८) क्रमांकाच्या रिक्षातून काही प्रवाशी घेवून चालक जात होते. त्यावेळी अचानक रिक्षाने पेट घेतला. ही बाब रिक्षा चालकाच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने रिक्षा रोडच्या बाजूला घेवून रिक्षा थांबविली. त्यानंतर क्षणातच रिक्षाने मोठा पेट घेतला. यात संपुर्ण रिक्षा जळून खाक झाली आहे. ही आग कोणत्या कारणामुळे लागली यांची माहिती समोर आलेली नाही. दरम्यान काही वेळानंतर महापालिकेचे अग्निशमन विभागाचे पथकातील युसुफ पटेल, भारत बारी, रविंद्र बोरसे आणि तेजस जोशी यांनी बंबासह घटनास्थळी दाखल झाले व आग विझविण्यात आली. याबाबत पोलीसात नोंद घेण्याचे काम सुरू होते.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS